आमच्याविषयी > महाराष्ट्राविषयी

७व्या शतकाच्या शिलालेखात आणि एका चीनी यात्रेकरुच्या लेखात महाराष्ट्राचा उल्लेख आढळला असे म्हटले जाते.

क्षेत्रफळ - ३०८,००० किमी

जिल्हे - ३५

लोकसंख्या - ११२,३७२,९७२

तालुके - ३५८

मूळ (स्त्रोत) - www.maharashtra.gov.in

महाराष्ट्रात ३५ जिल्हे असून प्रशासकीय हेतूने त्यांची विभागणी सहा महसूली विभागांत (कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर) आणि आठ शैक्षणिक विभागांत (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर, कोल्हापूर, आणि लातूर) करण्यात आली आहे. या 35 जिल्ह्यांची विभागणी 109 उपविभाग आणि 355 तालुक्यांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात स्थानिक अथवा जिल्हा स्तरावर नियोजनाच्या सक्षम यंत्रणांची दीर्घ परंपरा आहे. ग्रामीण भागात स्वयं-प्रशासनासाठी 33 जिल्हा परिषदा, 355 पंचायत समित्या आणि 27,993 ग्राम पंचायती कार्यरत आहेत. शहरी भागात 23 महानगर पालिका, 222 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायती कार्यरत आहेत.

मूळ (स्त्रोत) - www.mpsp.maharashtra.gov.in

क्विक लिंक्स
भारत सरकार पोर्टल
महाराष्ट्र शासन पोर्टल
एमएचआरडी
एसएसए पोर्टल
बालभारती
बालचित्रवाणी
डीआयएसई
एन.यू.ई.पी.ए.
एस.ई.एम.आय.एस.
एन.सी.ई.आर.टी.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद
संपर्क | उत्तरदायित्वास नकार | माहितीचा अधिकार